Thu, Jan 24, 2019 03:33होमपेज › Pune › पुणे: प्रिंटीगच्या दुकानाला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

पुणे: प्रिंटीगच्या दुकानाला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

Published On: Mar 14 2018 8:04AM | Last Updated: Mar 14 2018 8:56AM  पुणे : पुढारी ऑनालाईन

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या हिमालया नावाच्या इमारतीमधील खासगी प्रिंटीगच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या अपघातात दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लक्ष्मणराम उमाराम सुतार ( वय 33 राजस्थान) आणि नरपतसिंह यशवंतसिंह राजपूत वय 23 राजस्थान अशी मृत्यांची नावे आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) पहाटे पाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. या दुकानात मिठाईचे बॉक्स प्रिंटिंग करून देण्याचे काम चालत होते. घटनेवेळी दोन कामगार दुकानात झोपलेले होते. अचानक लागलेल्या आगीतून झोपलेल्या कामगारांना बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवली.  त्यानंतर दोन्हीं कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.