Mon, Aug 19, 2019 15:31होमपेज › Pune › पुणे : बाराव्या मजल्यावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

पुणे : बाराव्या मजल्यावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

Published On: Apr 18 2019 3:47PM | Last Updated: Apr 18 2019 3:55PM
पिंपरी : प्रतिनिधी 

इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आयटी अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.१८) दुपारी साडेबाराच्या सुमारास रहाटणीतील 'रॉयल ग्रीन' सोसायटीमध्ये घडली. रोहित बापूराव पाटील (२८, रा. रहाटणी, मुळगाव धुळे) असे आत्महत्या केलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. 

रोहित हा इलेक्ट्रिक इंजिनिअर असून तो हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीला होता. तो काही महिन्यांपासून मोठ्या भावासोबत रहाटणी येथे राहत होता. गुरुवारी दुपारी त्याचा भाऊ कामाला गेला, तर त्याची वहिनी घरात एकटीच होती. त्यावेळी रोहितने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली उडी मारली. सोसायटीतील रहिवाश्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत असल्याचे घोषित केले. 

रोहित काही दिवसांपासून आजारी होता. या आजारपणातूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.