Tue, Feb 19, 2019 20:54होमपेज › Pune › पुणे : चिंचवड मालवाहू टेम्पो जळून खाक(Video)

पुणे : चिंचवड मालवाहू टेम्पो जळून खाक(Video)

Published On: Aug 11 2018 2:46PM | Last Updated: Aug 11 2018 10:50PMपिंपरी : प्रतिनिधी

चिंचवड येथील उड्डाणपुलावर ‘शॉर्टसर्किट’मुळे मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतला. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र टेम्पो जाळून खाक झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

टेंपोचालक शिवाजी सावंत पिंपरीतील एका खासगी कंपनीत माल उतरवून माघारी जात असताना टेम्पोला आग लागली. सावंत यांनी प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने ते बचावले. नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळताच पिंपरी आणि प्राधिकरण येथून अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत टेम्पो जळून खाक झाला होता. या वेळी काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.

फोटोसाठी जीव धोक्यात

उड्डाणपुलाच्या मध्यभागी टेम्पो जळत असताना त्या ठिकाणी तरुणांची मोठी गर्दी झाली. आग भडकल्याने डिझेल टाकीचा जोरदार स्फोट झाला. अशा अवस्थेतही काही तरुण जीव धोक्यात घालीत टेम्पोजवळ जाऊन ही घटना मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी धडपड करीत होते.