Wed, Jul 24, 2019 06:41होमपेज › Pune › पुणे : कुत्र्याच्या हल्‍ल्यात बालकाचा मृत्यू

पुणे : कुत्र्याच्या हल्‍ल्यात बालकाचा मृत्यू

Published On: Mar 25 2018 11:58AM | Last Updated: Mar 25 2018 11:58AMपिंपरी : प्रतिनिधी

भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणगाव येथे ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. साहिल भुट्टो अन्सारी (वय ५ रा. मोहिते वस्ती माण, तालुका मुळशी) असे हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल घराबाहेर खेळत होता. त्यावेळी अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांनी साहिलवर हल्ला केला. मुलाचा रडण्याच आवाज ऐकून पालक बाहेर आले. गंभीर जखमी साहिल यास उपचाराकरता वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.
 

Tags : pune, pune news, dog attack