Sun, Mar 24, 2019 05:04होमपेज › Pune › ‘इच्छुक’ लागले  निवडणुकीच्या कामाला

‘इच्छुक’ लागले  निवडणुकीच्या कामाला

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:53PMपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अतिशय छोटी असलेली स्थानिक स्वराज्य संस्था. मात्र, ज्या राजकीय नेत्यांना या भागाची पूर्णपणे माहिती आहे, तोच या भागात टिकाव धरू शकतो. तसेच कोणतीही गोष्ट राजकीयदृष्ट्या निभावून नेण्याची क्षमता सुध्दा सिध्द करू शकतो. केवळ आठ नगरसेवक असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेत शहरातील सर्वांनाच वाटते की, या स्थानिक स्वराज्य संस्थेत लष्कराचे वर्चस्व आहे. थोड्या फार प्रमाणात ही बाब खरी आहे. मात्र तेवढ्याच प्रमाणात अधिकार नगरसेवकांना देखील आहेत. विशेष म्हणजे देशातील दोन क्रमांकाची आर्थिक उलाढाल या कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये होते आहे. त्यामुळेच राजकीयदृष्ट्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास अनन्य साधारण महत्व आहे.

मागील अनेक वर्षापासून कॅन्टोन्मेंटवर काँग्रेसपक्षाची सत्ता होती. मात्र मोदी प्रभावात तीन वर्षापूर्वी नागरिकांनी बदल घडवून सत्ता भाजप नगरसेवकांच्या हाती दिली. तीन वर्षात रोटेशन पध्दतीने तीन नगरसेवकांना ‘उपाध्यक्ष’ पदाची संधी मिळाली आहे. सध्या उपाध्यक्षपद प्रियंका श्रीगिरी यांच्याकडे आले आहे. अजुन एका नगरसेवकांस उपाध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक होण्यास अजुन दोन वर्षाचा कालावधी आहे. मात्र आत्तापासूनच ‘इच्छुक’ निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.

अर्थात सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक असून, त्यामध्येही हमखास निवडून येऊ शकतो. अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे हळूहळू हेलपाटे मारावयास सुरूवात करू लागले आहेत. वाढदिवस असो की, एखादा किरकोळ कार्यक्रम पुढे पुढे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धडपड सुरू झाली आहे. या इच्छुकांना आतापासूनच नगरसेवक होत असल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे हे इच्छुक आतापयर्र्ंत वॉर्डातील कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहत नव्हते. ते आता आर्वजून उपस्थित राहू लागले आहेत. धार्मिक कार्यक्रम म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच ठरत असल्याचे दिसू लागले आहे. एखाद्या कार्यक्रमात भाषण ठोकण्याची संधी मिळाली तर काय सोन्याहून पिवळे. त्याच्यासाठी. मग हे इच्छुक असे काय भाषण ठोकणार की काय, विचारूच नका.

वॉर्डातील समस्या काय आहेत. याची माहिती करून घेऊन त्या बोर्ड प्रशासनाच्या कार्यालयात जावून संबधित अधिकार्‍यास सांगून प्रसंगी निवेदन देऊन त्यावर तोडगा काढण्याची विनंती करण्यास हे इच्छुक मागे-पुढे पाहत नाहीत. इच्छुकांच्या या भानगडी सर्वसामान्य नागरिकांच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत. मात्र, ते देखील वाट पाहत आहेत. कोणत्या राजकीय पक्षाचे कोणाला तिकीट मिळणार याचे.त्यानंतरच कोणत्या  इच्छुकाने या मध्ये बाजी मारली याबाबत समजणार आहे. असे असले तरी सध्या निवडणुकीच्या तयारीला ‘इच्छुक’  लागले आहेत हे दिसून येत आहे.

-शिवाजी शिंदे
 

Tags : pune, pune news, Pune Cantonment Board, Election,