Wed, Jul 17, 2019 16:07होमपेज › Pune › पुणे : मागील वर्षीच्या ‘बजेट’ची ४० टक्के अंमलबजावणी

पुणे : मागील वर्षीच्या ‘बजेट’ची ४० टक्के अंमलबजावणी

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:39AMपुणे ः प्रतिनिधी

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दणदणीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने सन 2017-18 मध्ये सादर केलेल्या पहिल्या अंदाजपत्रकाची 40 टक्के अंमलबजवाणी केल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.  महापालिकेच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आले. 

त्यानंतर स्थायी समितीची रचना होऊन नवीन अंदाजपत्रक सादर करण्यास मे महिना उजाडला होता. त्यानंतर अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यातच राज्यशासनाकडून जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे अनेक निविदा आणि कामांच्या फेरनिविदा काढाव्या लागल्या. त्यामुळे आम्हाला काही महिनेच कामासाठी मिळाले असे मोहोळ यांनी सांगितले. त्यातही आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकलो असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. 

स्थायी समिती अध्यक्षांनी आपले अंदाजपत्रक मागील वर्षाच्या तुलनेत 42 कोटींनी कमी खर्चाचे सादर केले आहे. तर दुसर्‍या बाजूला पालिका आयुक्तांनी 2018-19 साठी सादर केलेल्या 5 हजार 397 कोटींच्या अंदाजपत्रकात तब्बल 473 कोटींची वाढ करत स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी आपले अंदाजपत्रक 5 हजार 870 कोटींवर नेले. ही जवळपास 500 कोटींची वाढ करताना पालिकेस केबल डक्टमधून 200 कोटी, जीएसटी अनुदानातून 125 कोटी, बांधकाम विभागाकडून 24 तासात बांधकाम परवानगी देणे सुरू केल्याने 65 कोटी, जाहिरात फलकांचे दर वाढविल्याने 30 कोटी, पाणी पटटीमधील वाढीने 40 कोटी, तर अग्निशमनदलाच्या उत्पन्नात 10 कोटींची वाढ गृहीत धरण्यात आलेली आहे. त्यामुळे ही वाढ प्रस्तावित करण्यात आल्याचा खुलासा मोहोळ यांनी केला आहे. 

2016-17 चे अंदाजपत्रक 5 हजार 748 कोटींचे होते. त्यात डिसेंबर 2016 अखेर केवळ 1934 कोटी रुपये (35 टक्के) भांडवली खर्च झालेला होता. तर 2017-18 चे अंदाजपत्रक 5 हजार 942 कोटींचे होते. तर डिसेंबर 2017 अखेर 2302 कोटी (40 टक्के) भांडवली कामांचा निधी खर्ची केल्याचा दावाही मोहोळ यांनी केला आहे.