Sun, Aug 25, 2019 01:38होमपेज › Pune › भाजपला सत्तेतून खाली खेचा : अशोक चव्हाण

भाजपला सत्तेतून खाली खेचा : अशोक चव्हाण

Published On: Apr 22 2019 1:51AM | Last Updated: Apr 22 2019 1:51AM
पुणे : प्रतिनिधी

देशाची लोकशाही धोक्यात आल्याची चिंता माजी न्यायाधीश व्यक्त करतात. सत्ताधार्‍यांचा प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप वाढला आहे. संविधानिक संस्था संपुष्टात आणल्या जात आहेत. भाजपच्या काळात राज्याची पीछेहाट झाली आहे. देशाला आणि राज्याला गतवैभव मिळण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि घटक पक्ष महाआघाडीच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी येथील महात्मा फुले मंडईत झाली. या सभेत ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, उमेदवार मोहन जोशी यांच्यासह महाआघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

अशोक चव्हाण म्हणाले, दहशतवादाला खतपाणी घालणार्‍यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंहने वादग्रस्त विधान करूनही देशाचे पंतप्रधान त्यांचे समर्थन करतात. 

मुख्यमंत्री गेल्या दोन वषार्र्ंपासून कर्जमाफीचा अभ्यासच करत आहेत.  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना आम्ही सोबत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांनी अवास्तव मागण्या करून धमार्र्ंध शक्तींना मदत करण्याची भूमिका घेतली.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, जातीधर्माच्या नावावर कोणी निवडून येता कामा नये. तसेच या निवडणुकीतून पुन्हा हुकूमशाह निवडून येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.   जे ज्येष्ठांचा सन्मान करीत नाहीत ते मतदारांचा सन्मान काय करणार? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला. या वेळी मोहन जोशी, खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, प्रवीण गायकवाड, आ. शरद रणपिसे, अंकुश काकडे यांचीही भाषणे झाली.

सत्तेवर आल्यानंतर पुलवामाची चौकशी 

देशाची अर्थव्यवस्था गंभीर परिस्थितीत आहे. सरकार जाहीर करीत असलेली आकडेवारी खोटी आहे. पुलवामा प्रकरणात कोणी निष्काळजीपणा केला आहे का, की मिळालेल्या माहितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर चौकशी करूच. निवडणूक हातातून जात असल्याने भाजपने धार्मिक धु्रवीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. म्हणूनच भाजपने साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी दिली आहे. शहीद जवानांसह पोलिसांचा अवमान करणार्‍या मोदींनी राज्याची जाहीर माफी मागावी.   अनेक आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहची उमेदवारी मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.