Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Pune › ‘पुढारी’तर्फे ‘लाँड्री @ होम’, ‘नाव नसलेले गाव’

‘पुढारी’तर्फे ‘लाँड्री @ होम’, ‘नाव नसलेले गाव’

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 14 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी

घरगुती वस्तूंच्या वापरातून किंवा घरी काही केमिकल्सच्या वापरातून त्याच दर्जाच्या सर्व्हिसेस घरच्या घरी कशा मिळवता येतील याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे लाँड्री सेमिनार ‘दै. पुढारी’तर्फे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 18) दुपारी 3 ते 6 या वेळेत सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये हा कार्यक्रम विनामूल्य होणार आहे. 

कच्च्या रंगाचे कपडे रंग न जाऊ देता कसे धुवावे, गंज, शाई, कॉस्मेटीक्स असे वेगवेगळे डाग कसे काढावेत, पांढरे कपडे दीर्घकाळ कसे शूभ्र दिसतील, कपड्यांचा नवेपणा कसा टिकवून ठेवावा, सोप्या पद्धतीने स्टार्च कसा करावा, स्कूल युनिफॉर्मपासून, कार्पेटपर्यंत वेगवेगळ्या टेक्श्चरनुसार धुलाई, रोल प्रेस, कॅलेंडर प्रेस, स्टीम प्रेस जुन्या सिल्क साड्यांना पुन्हा चमक कशी आणायची, अशा विषयांवर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे.

शाळेचे युनिफॉर्मस, नोकारदार लोकांचे कामाच्या ठिकाणी घालायचे कपडे, चादरी, बेडशिट्स, समारंभातले महागडे कपडे सगळे स्वच्छ करताना महिला हैराण होतात. त्यामुळे, व्हिज्युअल्ससहित होणार्‍या या सेमिनारमध्ये अत्यंत कमी खर्चात लॉँड्रीच्या दर्जाची चमक मिळवण्याच्या टिप्स, ट्रिक्स दिल्या जातील. 27 वर्षांहून अधिक काळ, 40 हून अधिक दर्जेदार उत्पादनासह संपूर्ण भारतात तसेच 15 हून अधिक देशांत क्वालिटी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी पितांबरी; होमकेअर, हेल्थकेअर, फूडकेअर, अगरबत्ती, परफ्युमरी, अ‍ॅग्रीकेअर, डिजिटल केअर अशा सर्व क्षेत्रांतील उत्पादनासह आपल्या घराची केअर करणार्‍या पितांबरीचे ‘क्लेन्झ नॅनो वॉश’ या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

सिल्व्हर पार्टिकल युक्त क्लेन्झ नॅनो वॉश 99%  अँटीबॅकटेरियल धुलाईची खात्री देते. त्यातील फॅब्रिक गार्ड फॉर्मुल्यामुळे कपड्याचे आयुष्य तर वाढतेच. त्याचबरोबर ऑप्टीकल ब्राइटनरमुळे कपड्याला अधिक चमक मिळते. वाढत्या प्रदूषणाच्या काळात 24 तास अंगावर राहणारे कपडे निर्जंतुक असणे गरजेचे आहे. जे ‘क्लेन्झ नॅनो वॉश’ मुळे शक्य होते. कार्यक्रमाला पुणे नवरात्र महिला महोत्सव समितीच्या अध्यक्षा जयश्री बागुल व माजी उपमहापौर आबा बागुल यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असला तरी नावनोंदणी मात्र आवश्यक आहे. संपर्कासाठी नंबर 8805007529, 9423903965

सुंदर स्वच्छ धुलाई घरच्या घरी

5 ब्रँचेस, 50 हून अधिक कर्मचार्‍यांच्या सहभागाने, दररोज अक्षरशः हजारो कपडे प्रोसेस करणारे ‘क्लासिक ग्रुप ऑफ ड्रायक्लीनर्स’ गेली 21 वर्षे लाँड्री व्यवसायात आहेत. रेग्युलर लाँड्री सर्व्हिसेस बरोबर जरी साडी पॉलिश, लेदर ड्रायक्लीनिंग, हेल्मेट ड्रायक्लीनिंग या विषयात त्यांची मास्टरी आहे. विदेशातून आयात केलेली अद्ययावत मशिनरी त्यांच्याकडे आहे. दुष्यंत निकम त्यांच्या टीमसह हे सेमिनार घेतील. लाँड्री हा व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍यांनाही इथे मार्गदर्शन केले जाईल.

नाव नसलेले गाव

अल्पावधीतच लोकप्रिय झालेला गाणी, नृत्य, दिलखुलास गप्पा असा हा धमाल कार्यक्रमदेखील या वेळी सदर होणार आहे. डॉ. पं. संदीप अवचट (विज्ञाननिष्ठ ज्योतिषी, सुप्रसिद्ध गीतकार, कवी), धनश्री गणात्रा (प्रथितयश गायिका), नीलिमा हिरवे -(सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना) यांचा सहभाग आहे.

कार्यक्रमस्थळी लकी ड्रॉ मध्ये 

नऊवारी नखरा कडून रु.2000/- किमितीची रेडिमेड नऊवारी साडी.

पितांबरी गिफ्ट हँपर्स.

लीज स्पा कडून तब्बल रु. 1000/- ची 3 गिफ्ट व्हाउचर्स.
    
या शिवाय
    
कार्यक्रमस्थळी प्रथम येणार्‍या 25 महिलांना लीज स्पा चे रु. 350/-   चे व्हाउचर

त्या नंतरच्या 15 महिलांना सुहाना पावभाजी मसाला 
पाकीट भेट.

प्रत्येकीला क्लासिक ग्रुप ऑफ ऑफ ड्रायक्लीनर्सतर्फे 2 कपडे फ्री ड्रायक्लीनिंगचे गिफ्ट व्हाउचर.