Mon, Apr 22, 2019 16:06होमपेज › Pune › खा. बारणे यांच्या कार्यअहवालाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

खा. बारणे यांच्या कार्यअहवालाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 12:41AMपिंपरी :  प्रतिनिधी 

खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पुर्ण झाली आहेत.  शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते खा. बारणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन शुक्रवार (दि. 1)  करण्यात आले. 

प्रकाशन प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मनोहर भोईर उपस्थित होते. गेली चार वर्षा मध्ये त्यांनी लोकसभेमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील व देशाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्‍नांवर आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. खा. बारणे लोकसभेचे सदस्य झाल्यापासून संसदेमध्ये आत्तापर्यंत 935 तारांकित व अतारांकित प्रश्‍न मांडले, तसेच 255 वेळा प्रत्यक्ष चर्चेत त्यांनी सहभाग घेतला, तर 16 महत्वाच्या विषयांवर खाजगी विधेयके मांडली असून त्यांची लोकसभेतील एकूण उपस्थिती 95 टक्के राहिली असून 100 टक्के स्थानिक खासदार निधी खर्च केला आहे. 

या अहवालामध्ये त्यांनी केलेली विकास कामे, संसदेमध्ये मांडलेले प्रश्‍न, त्यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा, स्थानिक खासदार निधीतून केलेल्या कामाचा तपशील, पंतप्रधान साह्यता निधीतून केलेली मदत याची सविस्तर माहिती सादर केली आहे.