Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Pune › अंध, अपंग विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती

अंध, अपंग विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:07PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

आम्ही अंध असून वाहतुकीचे नियम पाळू शकतो, तर तुम्ही डोळस आहात, तुम्ही वाहतुकीचे नियम का पाळू शकत नाही? वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत, मग ते मोडता कशाला? वाहतुकीचे नियम पाळा. त्यामुळे शहराला चांगली शिस्त लागेल, असा सल्ला अंध व अपंग मुलांनी पिंपरी येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या नागरिकांना दिला.

ओम साई फाउंडेशन व संजय मराठे यांच्या वतीने नववर्षाची सुरुवात व सरत्या वर्षाचा शेवट चांगला होण्यासाठी अंध व अनाथ मुलांच्या हस्ते नागरिकांना गुलाबपुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी मुलांनी पोलिस अधिकार्‍यांना गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम नागरिकांंकडून चांगल्या प्रकारे पाळून घेण्यासाठी आवाहन केले. वाहने चालवताना कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, असाही सल्ला या वेळी मुलांनी दिला.

सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस हवालदार नवनाथ कोकाटे, भारत पारधी, अनिल जाधव, अहीर साहेब, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, ममता अंध अनाथ कल्याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे, नितीन शैवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश मातणे यांनी केले. प्रिती मराठे यांनी आभार मानले.