Tue, Sep 25, 2018 11:07



होमपेज › Pune › सार्वजनिक सायकल प्रकल्पाचा प्रारंभ

सार्वजनिक सायकल प्रकल्पाचा प्रारंभ

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:40AM



पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी (दि. 26) सकाळी  कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर व त्यानंतर राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे  झाला    यावेळी आ लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरवपर्यंत सायकलने जात पर्यावरणाचा संदेश दिला.

महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार लक्ष्मण जगताप,  स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, मनसेचे गटनेते सचिन चिखले. अतिरिक्त आयुक्त  दिलीप गावडे, नीलकंठ पोमन,नगरसेवक नाना काटे, शत्रूघन काटे, निर्मला कुटे, सागर आंघोळकर, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, उषा मुंडे, शशिकांत कदम आदी उपस्थित होते.  महापौर म्हणाले की, पिंपळे सौदागर भागाचा स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झाला आहे.नागरिकांच्या सहभागातून परिसराचा सौंदर्यात भर पडेल महापालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर   म्हणाले, की   शहरातील स्मार्ट सिटीअंतर्गतचा हा पहिलाच प्रकल्प आहे पर्यावरणाचे महत्त्व जाणून त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांच्या सहभागातूनच असे प्रकल्प यशस्वी होतील, असे ते म्हणाले.