Wed, Jul 17, 2019 18:19होमपेज › Pune › बोअरिंगच्या वृत्‍ताची प्रशासनाकडून दखल

बोअरिंगच्या वृत्‍ताची प्रशासनाकडून दखल

Published On: Mar 25 2018 1:52AM | Last Updated: Mar 25 2018 12:40AMकोरेगाव पार्क : वार्ताहर

ताडीवाला भागातील  पानमळ्यातील सार्वजनिक बोअरींग काढून टाकल्याचे वृत्‍त दैनिक पुढारीत प्रसिध्द झाले होते. त्या वृत्‍ताची दखल घेत बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाने संबधित बिल्डरला नोटीस पाठविली आहे.शासकिय मालमत्‍तेचे नुकसान केले असून याबाबतचा खुलासा करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचे कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून सांगण्यात आले  आहे.    

पानमळ्याजवळील पिंपळाच्या झाडाखाली सार्वजनिक मालमत्‍तचे बोअरींग होते परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बोअरींग होते.सद्या बेलवणकर हौसिंग कंपनीकडून एसआरए चा टोलेजंग प्रकल्पाचे काम चालू आहे.प्रकल्पाकडे जाणार्‍या रस्त्यावर सार्वजनिक बोअरींग रातोरात काढून टाकले होते हि गंभिर बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने प्रशासनाला कळविण्यात आले होते.