Fri, Apr 26, 2019 09:37होमपेज › Pune › पुणे : संविधान जाळल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

पुणे : संविधान जाळल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

Published On: Aug 18 2018 1:01PM | Last Updated: Aug 18 2018 1:01PMपुणे : पुढारी ऑनलाईन

दिल्लीत संविधान जाळल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी भारतीय संविधानाची प्रत जाळून आरक्षण हटाव आशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपींवर अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करून मातंग एकता आंदोलन युवक आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, संजय साठे, रोहित अवचिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.