Wed, Apr 24, 2019 00:16होमपेज › Pune › देहूफाटा नियोजित अंडरपासला अडचणी

देहूफाटा नियोजित अंडरपासला अडचणी

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:43PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

मुंबर्ट-पुणे महामार्गावर देहुफाटा येथे भविष्यातील वाहतुकीचा ताण विचारात घेता व्हेईकल अंडरपासची नितांत गरज आहे. देहूरोड लष्करी छावणीचे एरिया कमांडर आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांचे त्यासाठी अत्यंत तडफेने प्रयत्न सुरू आहेत. पण या कामात नव्याने निर्माण झालेल्या अडचणीमुळे आता त्याचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड ते निगडी या सुमारे सव्वा सहा किलोमीटरच्या अंतरात अनेक वर्षे रखडलेले चौपदरीकरण गत वर्षी सुरू झाले. या कामाची सुरूवात झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काही नवे प्रश्‍न निर्माण झाले. यापैकी महत्वाचा प्रश्‍न होता केंद्रीय विद्यालय, देहुफाटा आणि शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना याठिकाणी वाहतुकीचा ताण पाहता व्हेईकल अंडरपासची गरज. या तांत्रीक बाबी नंतर अधिकार्‍यांच्या लक्षत आल्या आणि यातील शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना आणि केंद्रीय विद्यालय या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम करण्यात आले; मात्र, सर्वात महत्वाच्या देहुफाटा येथे वाहतुकीचा ताण अधिक असल्यामुळे, तसेच येथुन लष्कराची अनेक लहान मोठ्या वाहनांची सतत ये-जा असल्यामुळे भुयारी मार्ग शक्य नसल्याचे तंत्रज्ञांच्या पाहणीतून स्पष्ट झाले. 

आमदार  संजय भेगडे यांनी काही महिन्यांपूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांसोबत देहूरोड येथील उड्डाणपूलाच्या कामाचा आढावा घेतला. तेव्हा ब्रिगेडियर वैष्णव यांनी देहुफाटा येथील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधले होते. या ठिकाणी भुयारी मार्ग अशक्य असून येथे व्हेईकल अंडरपास हाच पर्याय असल्याचे सांगण्यात आले. या अनुषंगाने ब्रिगेडियर वैष्णव, आमदार भेगडे तसेच बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांच्या शिष्टमंडळाने रस्ते विकास मंडळाचे व्यस्थापकिय संचालक राधाकृष्ण मोपलवार यांची भेट घेण्यात आली. 

चर्चेअंती रस्ते विकास मंडळाने या अंडरपासची तयारी दर्शविली. मात्र, अंडरपासचे काम होईपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या भागात मोकळी असलेली जागा लष्राच्या मालकीची असुन ए-वन श्रेणीतील आहे. त्यामुळे ही जागा देण्यात अडचणी आहेत. पर्यायी जागेच्या अडथळ्यामुळे आता हा नियोजित अंडरपास अडचणीत आला आहे. याच ठिकाणाहुन दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होते. त्यामुळे अंडरपासचा मुद्दा जिव्हाळ्याचा बनला आहे. मात्र, तांत्रिक बाबी पुढे करून हा महत्वाचा प्रश्‍न दुर्लक्षीत केला 
जात आहे.

येत्या काही दिवसांत अधिकारी बदलून जातील, रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल. पण सर्वात महत्वाचा प्रश्‍न तसाच प्रलंबीत राहिल, एकदा देहूरोडचा उड्डाणपूल सुरू झाला, की महामार्गावरील वाहतुकीचा वेग वाढेल, आणि अपघातांचा धोका वाढेल. भविष्यातील धोका टाळायचा असेल तर आताच हा अंडरपासचा प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे, असे ब्रिगेडियर वैष्णव यांचे म्हणणे आहे. आमदार भेगडे यांनी हा तिढा सोडविण्याचे आश्‍वास दिले आहे. आता पुढे त्याचे काय होईल हे येणारा काळच ठरवील. 

मेट्रोप्रामाणे खांब उभारुन छोटा पूल शक्य ?

सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे खांब भररस्त्यात उभारण्यात आले आहेत. त्याधर्तीवर येथील व्हेईकल अंडरपासचा प्रश्‍न सोडविता येऊ शकेल, असा विश्‍वास ब्रिगेडियर वैष्णव यांनी व्यक्त केला. खांबे उभारून छोटा उड्डाणपूल तयार केल्यास मोठा खर्च, वेळ आणि जागा वाचेल, अशी सूचना त्यांनी केली आहे.