Wed, Sep 19, 2018 13:05होमपेज › Pune › बंजारा समाजाला जातीच्या दाखल्यासाठी येतात अडचणी

बंजारा समाजाला जातीच्या दाखल्यासाठी येतात अडचणी

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:26PMयेरवडा : वार्ताहर

लमाण बंजारा समाजा एका जागी स्थिर नसल्यामुळे या समाजाला जातीचा दाखला मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या समाजातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून बेरोजगारी वाढली आहे. अन्नधान्य पुरवठा तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी लक्ष घालावे अशी मागणी अखिल पुणे शहर लमाण बंजारा समाजाच्यावतीने बापट यांना निवेदन देवून केली आहे.

लमाण बंजारा समाज हा भटक्या विमुक्त जातीमध्ये मोडत असून आज जागायत भटकंती मुळे हा समाज शैक्षणिक, सामाजिक आदी गोष्टींपासून वंचित आहे. समाजाची आजची परिस्थिती अंत्यत हलाखीची आहे तसेच शिक्षणाची बेरोजगारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात समाजात आहे. 

यामुळे पालकमंत्री बापट यांनी बंजारा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लक्ष घालून जातीच्या दाखल्याचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी अनिल राठोड यांनी केली आहे. दरम्यान, बंजाराचा समाजाचे प्रेरणास्थान संत सेवालाल महाराज यांची  15 फेब्रुवारीला जयंती असते सदर दिवशी महाराष्ट्रात सरकारी  सुट्टी जाहीर करावी अशी देखील मागणी समाजाच्यावतीने राठोड यांनी केली आहे.