Thu, Apr 25, 2019 18:49होमपेज › Pune › स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरी सुविधांचे खासगीकण

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरी सुविधांचे खासगीकण

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेचे चांगले अधिकारी आणि मोक्याच्या जागा फक्त स्मार्ट सिटी कंपनीने ताब्यात घेतल्या आहेत. ज्या ठिकाणी विकासाची आवश्यकता आहे तो भाग न घेता, विकसित परिसर स्मार्ट सिटीने विकासासाठी घेतला. शहरातील नागरिकांच्या सुविधांचे खासगीकण करण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून केला जात आहे. शाब्दिक खेळ करून फसवणूक करणे, ही सरकारची खेळी आहे, असा सूर ‘स्मार्ट सिटी’च्या फज्जाची दोन वर्षे’या विषयावरील चर्चासत्रात निघाला. 

स्मार्च सिटीच्या उद्घाटनास दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसतर्फे ‘स्मार्ट सिटीच्या फज्जाची दोन वर्षे’ विषयावर सोमवारी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते कॉ. अजित अभ्यंकर, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षि, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सहभाग घेतला. रत्नाकर महाजन म्हणाले, वर्षभरातच मोदी सरकारच्या प्रत्येक आकर्षक योजनांचा व्यर्थपणा लोकांसमोर आला. स्मार्ट सिटीची संकल्पना व्यावसायिक हितसंबंधांचे जाळे जगभर पसरावे, यासाठी एका कंपनीने मांडली. तिचा हा भारतीय अवतार आहे. मोदी सरकारने विकासाच्या नावाखाली ज्या कल्पना, धोरणे, योजना आखल्या, त्या शायनिंग इंडिया परंपरेतील आहेत. संकल्पनांचा सुकाळ व अंमलबजावणीचा दुष्काळ हे मोदी सरकारचे काम आहे. कॉ. अजित अभ्यंकर म्हणाले, शाब्दिक खेळ करून फसवणूक करणे, ही सरकारची खेळी आहे.

स्मार्ट सिटी हा प्रकल्प शहरातील नागरिकांच्या सुविधांचे खासगीकण करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून धूळफेक केली जात आहे. एसपीव्ही (स्पेशल पर्पस व्हेहिकल) ही कंपनी प्रशासनाच्या खासगीकरणाचे पाऊल आहे. प्रकल्पांसाठी कर्जरोखे काढून शहराला कायमचे कर्जाच्या खाईत ढकलले गेले आहे. कुमार सप्तर्षी यांनी मनोगत व्यक्त केले.अंकुश काकडे म्हणाले, स्मार्ट सिटीने जाहीर केलेल्या 14 प्रकल्पातील एक प्रकल्प पूर्ण झाला नाही. पालिकेचे चांगले अधिकारी आणि मोक्याच्या जागा फक्त स्मार्ट सिटी कंपनीने ताब्यात घेतल्या गंज पेठ, नाना पेठ, भवानी पेठ येथे व्हायला हवे होते, मात्र त्यांनी बाणेर बालेवाडीचा विकसित भाग निवडला. स्मार्ट सिटीत झोपडपट्टी विकासासाठी एक नवा पैसे समावेश नाही. प्रास्ताविक काँग्रसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केले.