Mon, Jul 06, 2020 15:26होमपेज › Pune › पुणे : कारागृहातून सुटलेल्या कैद्याचा पुर्ववैमनस्यातून येरवड्यात कोयत्याने वार करून खून

पुणे : कारागृहातून सुटलेल्या कैद्याचा पुर्ववैमनस्यातून येरवड्यात कोयत्याने वार करून खून

Last Updated: May 28 2020 8:57AM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा

पुर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. मागील दोन ते तीन दिवसातील येरवडा परिसरातील ही खूनाची दुसरी घटना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नितीन शिवाजी कसबे (वय 24,रा. भिमज्योत मित्रमंडळ जवळ येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शादलबाबा चाैक रोडवर रेड्डी हाॅटेलच्या समोर येरवडा येथे घडली. याप्रकरणी, नागेश राजू कांबळे (वय 25, रा. वैदवाडी हडपसर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात 16 जणांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून, पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मयत मेव्हण्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याला नैवद्य दाखवून कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेला कैदी नितीन कसबे , सागर कसबे,  फिर्यादी नागेश कांबळे व कुणाल चांदने हे रस्त्याने पायी चालत निघाले होते. दरम्यान, मागील काही दिवसापुर्वी कुणाल चांदने व आकाश कनचिले यांच्यात भांडणे झाली होती. त्याच भांडणाचा राग मनात धरून कनचिले याने दहा ते बारा जणांचा जमाव एकत्र करून त्यांच्यावर कोयता, दगडाने  हल्ला केला. त्यामध्ये नितीन कसबे हा गंभीर जखमी होऊन मृत झाला. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात पाठविला. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.