होमपेज › Pune › पंतप्रधानांचा फोटो महापुरुषांच्या पंगतीला; मोदी भक्तांचा कारभार

पंतप्रधानांचा फोटो महापुरुषांच्या पंगतीला; मोदी भक्तांचा कारभार

Published On: Mar 18 2018 3:48PM | Last Updated: Mar 18 2018 3:48PMवाकड : वार्ताहर

पिंपरी चिंचवड येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात महापुरुषांच्या फोटोसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाने ही बाब निदर्शनास आणून दिली. परिवहन कार्यालयातील मोदी भक्तांच्या या कारभारावर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २४ मधील शिवसेनेचे नगरसेवक ॲड.सचिन भोसले काही कामानिमित्त चिखलीरोड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. यावेळी परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या केबिन मध्ये गेले असता त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटो महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या फोटोच्या आधी लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत परिवहन अधिकारी आनंद पाटील यांना विचारले असता त्यांची धांदल उडाली. त्यांनी तात्काळ तो फोटो हटवण्याचे आश्वासन दिले. याबाबत पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु  त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


Tags : Pune, Pune news, Narendra Modi, Dr.babasaheb ambedkar,Mahatma Gandhi,B. R. Ambedkar,