Mon, Jan 21, 2019 04:44होमपेज › Pune › पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालिकेचा गौरव

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालिकेचा गौरव

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

अमृत, स्मार्ट सिटी मोहीम आणि पंतप्रधान आवास योजनेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेचा गौरव करण्यात आला.  

महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त पालिका आयुक्त शीतल तेली-उगले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप आणि पालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्मार्ट सिटी स्पर्धेत सुशासन श्रेणीत पीएमसी केअर प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात आला. 

या वेळी देशात सर्वाधिक 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारून सुधारणा घडविल्याबद्दल पुणे महापालिकेला प्रशस्तीपत्रक आणि 25 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिकही देण्यात आले.