Sat, Jun 06, 2020 19:11होमपेज › Pune › राष्ट्रपतीपदाचा रस्ता माझ्यासाठी नाही : शरद पवार 

राष्ट्रपतीपदाचा रस्ता माझ्यासाठी नाही : शरद पवार 

Published On: Dec 30 2017 1:52PM | Last Updated: Dec 30 2017 3:00PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

भावी राष्ट्रपती म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केल्यानंतर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्याच कार्यक्रमात हा रस्ता माझ्यासाठी नाही असे उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

एकदा राष्ट्रपती किंवा राज्यपाल झाले की राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे समजले जाते. मात्र याला अपवाद फक्त शिंदे यांचा असून ते राज्यपाल झाल्यावरदेखील ते गृहमंत्री झाले. राष्ट्रपती पदाचा रस्ता माझा नाही. मला शेवटपर्यंत लोकांमध्ये जाता येईल तो रस्ता माझा आहे.’अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीच्या सन्मानार्थ 'भारताची प्रतिभा' या गौरवग्रंथाचे अनावरण शनिवारी पुण्यात  करण्यात आले. त्यावेळी शिंदे आणि पवार यांचा कलगीतुरा उपस्थितांना बघायला मिळाला.

वाचा : शरद पवार भावी राष्ट्रपती : सुशीलकुमार शिंदे