Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Pune › महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात 

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:15AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील भूगांव येथे होणार्‍या  61 व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिनांक 19 डिसेंबरपासून 24 डिसेंबर पर्यंत कुस्तीचा थरार कुस्तीप्रेमींना अनुभविता येणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच मामासाहेब मोहोळ यांच्या गावी भूगांव येथे ही स्पर्धा होणार आहे. 

समस्त ग्रामस्थ भूगांव, मल्लसम्राट प्रतिष्ठान भूगांव आणि मुळशी तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदकेसरी अमोल बराटे, कुस्तीपटू जोगिंदर सिंग, शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, संदीप इंगवले,संदीप तांगडे यांनी तयारीचा आढावा घेतला.  रमेश सणस, अनिल पवार, मनोहर सणस, समीर साळुंके, कुमार शेडगे, अमोल भिलारे,बाजीराव खाणेकर, रामभाऊ चोंधे, सचिन तांगडे, संदीप चोंधे यावेळी उपस्थित होते. स्पर्धेसाठी गादी व मातीचे आखाडे तयार करण्यात आले असून  50 बाय 50 चे गादीचे 2 आणि मातीचे 2 असे आखाडे केले आहेत. तब्बल 40 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रेक्षकांप्रमाणे स्पर्धकांना देखील स्पर्धा पाहता यावी यासाठी वेगळी गॅलरी तयार करण्यात आली आहे. 

स्पर्धेचे आयोजक शिवाजी तांगडे म्हणाले, पैलवानांचे गाव समजल्या जाणाजया भूगांवमध्ये प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. स्पर्धेसाठी ग्रामस्थांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धक, प्रेक्षक आणि अधिकाजयांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.