Thu, Apr 18, 2019 16:09होमपेज › Pune › पुणे : पूर्ववैमनस्यातून तिघांवर जीवघेणा हल्ला

पुणे : पूर्ववैमनस्यातून तिघांवर जीवघेणा हल्ला

Published On: Feb 10 2018 9:57AM | Last Updated: Feb 10 2018 9:57AMदेहूरोड : वार्ताहर

पुण्यातील निगडी परिसरा पूर्ववैमनस्यातून तिघा तरूणांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास हा हल्ला झाला.  हल्लेखोरांनी या तरूणांच्या दुचाकीस धडक देण्याचा देखील प्रयत्न केला. यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

राजकुमार कलिमूर्ती (वय - ४१), सतीशकुमार स्वामी कन्नु (वय -३२) आणि अरविंद कुमार राजकुमार (१८, सर्व रा. एम.बी. कँम्प, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत. पुर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.  सुरेश भिगानिया, सागर भिगानिया, राकेश भिगानिया यांच्यासह आणखीन दोन  तरूणांनी हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

सुरेश भिगानिया याच्याबरोबर या तिघा जखमी युवकांचे काही दिवसापूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी भिगानिया यांने जखमी युवकाच्या घरावर हल्ला करत मोठे नुकसान केले होते. त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भिगानिया याच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर तरुणांवर  हल्ला झाल्याचा संशय आहे. देहूरोड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.