Tue, Nov 20, 2018 11:06होमपेज › Pune › बुद्धिमापन चाचणीसाठी मिळणार पसंतीचे केंद्र

बुद्धिमापन चाचणीसाठी मिळणार पसंतीचे केंद्र

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 1:05AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यात शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणार्‍या अभियोग्यता व बुध्दिमापन चाचणीला येत्या 12 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध झाली असून, यात प्रथम प्राधान्यानुसार परीक्षार्थींना केंद्रे देण्यात आली नव्हती; त्यामुळे परीक्षार्थींची  हेळसांड होणार असून, हजारो परीक्षार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता असल्याचा प्रकार दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणला होता; त्यामुळे शासनाचा आयटी विभाग खडबडून जागा झाला असून, त्यांनी परीक्षार्थींचे केंद्र बदलून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच जास्तीत जास्त परीक्षार्थींना प्रथम प्राधान्याचे केंद्र देण्याचा प्रयत्न आयटी विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी अभियोग्यता व बुध्दिमापन चाचणी 12 ते 21 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यासाठी तीन बॅचचे नियोजन करण्यात आले असून, सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी 9 ते 11 या बॅचच्या परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचण्याची वेळ सकाळी 7.30 आहे. यासाठी अर्ज भरताना तीन प्राधान्यक्रम परीक्षार्थींना भरण्यास सांगण्यात आले होते. तसेच त्यांना प्रथम प्राधान्याचे केंद्र देण्यात येई, असेदेखील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र परीक्षार्थींना अपेक्षित नसलेले तिसर्‍या प्राधान्यक्रमाचे केंद्र देण्यात आले. काहींना तर प्राधान्यक्रम न दिलेलेच केंद्र देण्यात आल्याचा प्रकारदेखील उघडकीस आला आहे.

अभियोग्यता व बुध्दिमापन चाचणीसाठी केंद्र देताना शासनाच्या आयटी विभागाने खोडसाळपणा केल्याचा आरोप परीक्षार्थींनी केल्यानंतर मात्र आयटी विभागाने   या संदर्भात एक बैठक घेण्यात आली.   तसेच  केंद्र बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दिवस-रात्र काम करण्यात येत असून, येत्या दोन दिवसांमध्ये परीक्षार्थींना देण्यात आलेली सध्याची केंद्रे बदलून त्यांना प्रथम प्राधान्याची केंद्रे देण्यात येणार आहेत. तसेच जर कोणत्या परीक्षार्थीला केंद्रासंदर्भात काही अडचण आली तर िा1.ारहररिीळज्ञीहरऽारहरळीं.ेीस या ई-मेलवर संपर्क करावा, असेदेखील आयटी विभागामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान अभियोग्यता व बुध्दिमापन चाचणीसाठी 1 लाख 98 हजार 169 विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहेत.