Tue, Nov 20, 2018 19:20



होमपेज › Pune › वीज चोरीच्या नोेंदीसाठी  सात पोलिस ठाणी निश्‍चित

वीज चोरीच्या नोेंदीसाठी  सात पोलिस ठाणी निश्‍चित

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:07AM



पुणे : प्रतिनिधी

राज्यात वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी तसेच वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात 132 पोलिस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान पुणे शहर आणि ग्रामीण भागात सुमारे सात पोलिस ठाणी निश्‍चित करण्यात आली आहेत. याबाबत गृह विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. या 132 पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंजाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येणार आहेत. मोठ्या शहरांमध्ये 5 पोलिस ठाण्यांना वीज चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

यापूर्वीचे महावितरणची 6 पोलिस ठाणी बंद करण्यात आले, वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे 10 टक्के वितरण हानी होत आहे.  राज्यात अहमदनगर जिल्ह्यात 4 पोलिस ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात 5, बीड जिल्ह्यात 4, ठाणे जिल्ह्यात 10, धुळे जिल्ह्यात 3,  हिंगोलीत 3, नांदेड जिल्ह्यात 4 पोलिस ठाणे, नाशिक जिल्ह्यात 5, जालन्यात 3, परभणी जिल्ह्यात 3, उस्मानाबाद 3, लातूर 3, नागपूर शहर व ग्रामीण मिळून 7, पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.

पुणे शहर व ग्रामीण मिळून 7 पोलिस ठाण्यांमध्ये वीज चोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 4, अकोला 3, अमरावती 4, भंडारा 2, बुलढाणा 2, चंद्रपूर 3, गडचिरोली 2. गोंदिया जिल्ह्यात 3, जळगाव  जिल्ह्यात 4, कोल्हापूर जिल्ह्यात 2, नंदूरबार 3, पालघर 6, रायगड 4, रत्नागिरी 2, सांगली 3, सातारा 3, सिंधुदुर्ग 2, वर्धा 2, वाशिम 3, यवतमाळ 4, मुंबई शहर व उपनगरात 7 पोलिस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील.