Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Pune › बालिकांशी अश्‍लील कृत्य

बालिकांशी अश्‍लील कृत्य

Published On: Apr 16 2018 1:43AM | Last Updated: Apr 16 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील सोसायट्या तसेच कंपन्यामध्ये  काम करणारे सुरक्षा रक्षक घरातील ऐवजांवर डल्ला मारत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता सुरक्षा रक्षक बालिकांशी खेळण्याच्या बहाण्याने अश्‍लील कृत्य करत असल्याचे  कोंढवा आणि हडपसर भागातील दोन ताज्या घटनांवरून पुढे आले आहे. या वेगवेगळ्या प्रकरणात दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सुरक्षा रक्षक सेवक महादेव तरंगे (वय 38, रा. हडपसर) याला हडपसर पोलिसांनी अटक केले आहे. याप्रकरणी 32 वर्षीय आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरंगे हा फिर्यादींच्या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून आहे. दरम्यान फिर्यादींची 12 वर्षीय मुलगी त्यांच्या सोसायटीखाली लिफ्टने कामानिमित्त येत होती. मात्र, त्यावेळी आरोपी तरंगे याने लिफ्ट चार ते पाच वेळा खालीवर नेहून जबरदस्तीने अश्‍लील कृत्य केले. मुलीने तत्काळ पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्हा दाखल केला. 

 दुसरी घटना कोंढवा येथे घडली असून पोलिसांनी मल्लीकार्जुन दुडप्पा पाटील (वय 58, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याप्रकरणी दहा वर्षीय पीडित मुलींने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील हा कोंढव्यातील एका मोठ्या सोसायटीत सुरक्षा रक्षक आहे. मुलगी सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळत होती. त्यावेळी आरोपींने तिला पाच रुपये देऊन खाऊ आणण्यास सांगितले. त्यानंतर घसरगुंडी खेळताना तिच्यासोबत अश्‍लील कृत्य केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पाटील याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत. 

शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पोलिसांकडून सांगण्यात येणार्‍या नियमांचे पालन न करता अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.  पोलिसाच्या तपासात आतापयर्र्ंत अनेक सुरक्षा रक्षक, नोकरांच्या चोरीच्या घटनांमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी नोकर तसेच सुरक्षा रक्षक ठेवताना त्याचे चारित्र्य पडताळणी तसेच पूर्ण माहिती घेऊनच कामावर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Tags : pune, pune news, Pornographic, acts, with children,