Mon, Jul 22, 2019 00:37होमपेज › Pune › गरीब विद्यार्थ्यांना मिळणार जेईई, नीट परीक्षांचे मोफत मार्गदर्शन

गरीब विद्यार्थ्यांना मिळणार जेईई, नीट परीक्षांचे मोफत मार्गदर्शन

Published On: Aug 07 2018 1:23AM | Last Updated: Aug 07 2018 1:07AMपुणे ः प्रतिनिधी 

राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना जेईई व नीट परीक्षांची तयारी करण्यासाठी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी गेल्या 12 वर्षांपासून मोफत मार्गदर्शन करणार्‍या ‘दक्षणा फाउंडेशन’ या संस्थेमध्ये याबाबत करार करण्यात आला. 

करारानुसार इयत्ता बारावीनंतर एक वर्ष नि:शुल्क नीट व जेईईचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलांचा राहण्याचा व भोजनाचा खर्चही संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. दक्षणा फाउंडेशनबरोबर झालेल्या करारानुसार शासकीय तसेच शंभर टक्के अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हावार निवड परीक्षा घेण्यात येणार येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पादन दीड लाखांपेक्षा कमी  असावे.

दहावीत गणित व विज्ञान विषयात 70 व त्यापेक्षा अधिक टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. ही निवड परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना आपापल्या शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांची यादी  www.dakshana.org या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.