होमपेज › Pune › पुणे : थर्माकॉलच्या दुकानाला भीषण आग 

पुणे : थर्माकॉलच्या दुकानाला भीषण आग 

Published On: Mar 09 2018 1:23PM | Last Updated: Mar 09 2018 1:22PMपुणे : प्रतिनिधी

शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मध्यवस्तीतील बोहरी आळी येथील लक्ष्मी मार्केट मधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या थर्माकोलच्या दुकानाला भीषण आग लागली. यामुळे परिसरात सर्वत्र धावपळ आणि गोंधळ झाला आहे.

अग्निशामक दलाच्या पाच गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाल्या आहे. मात्र, या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या आत जात नसल्याने आग विझवण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे.