Sun, Nov 18, 2018 06:02होमपेज › Pune › पुण्यात फिरणे म्हणजे ७ सिगारेट पिण्याची शिक्षाच

पुण्यात फिरणे म्हणजे ७ सिगारेट पिण्याची शिक्षाच

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी

शहरात प्रदूषण एवढे वाढले आहे की, दिवसभरात फेरफटका मारत असाल तर सात  सिगारेट पिल्यावर जेवढी फुप्फुसाची हानी होते तेवढाच परिणाम तुमच्यावर झालेला असेल. हा धक्कादायक निष्कर्ष काढला आहे जगभर प्रदूषणाचे सर्वेक्षण करणार्‍या एका एपने. 

Shoot! I smoke या अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनवर जगातील कुठल्याही शहराच्या विविध भागांतील हवेत तरंगणार्‍या अतिसूक्ष्म धूलिकणांची (पीएम 2.5) माहिती मिळते. 

एक सिगारेट म्हणजे पीएम 2.5. 22 मायक्रॉन प्रति घनमीटर प्रमाण. दिवसभरात 22 मायक्रॉन प्रति घनमीटर प्रदूषित हवा श्वसनातून फुफ्फुसात जाणे म्हणजे एक सिगारेट  पिण्यासारखेच आहे, असे या एपचे मत आहे. 

शहरात गेल्या तीन दिवसांपूर्वी दिवसाला सात सिगारेट पिण्याएवढी प्रदूषित हवा होती. पावसामुळे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे. त्यामुळे हे प्रमाण तीन सिगारेटपर्यंत खाली आले असल्याची  ऍपची माहिती आहे. 

कोणत्या शहरात किती सिगारेट ओढल्याचे प्रमाण (सोमवारची पावसानंतरची स्थिती )

पुणे : 3.1 
पिंपरी : 3
नागपूर : 4.5 
नाशिक : 2.5
मुंबई : 3.5
औरंगाबाद : 2.5
कोल्हापूर : 3.4
अहमदनगर  2.1