Thu, Jul 18, 2019 13:04होमपेज › Pune › संत तुकारामनगरमध्ये रंगले ‘टपर्‍यां’चे राजकारण

संत तुकारामनगरमध्ये रंगले ‘टपर्‍यां’चे राजकारण

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:29AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरीतील संत तुकारामनगर मध्ये अनधिकृत टपर्‍यांवरील कारवाईवरुन राजकरण तापले असून महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी महपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर सत्तेचा गैरवापर करून विरोधक व गोरगरिबांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँगे्रस यांच्या टपर्‍यांच्या कारवाईवरून राजकारण रंगले आहे. 

भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांनी महापालिका अतिक्रमण पथक विरोधी पक्षावर मेहरबान असल्याचा आरोप रविवार केला होता. त्याला बहल व लांडे यांनी प्रतिउत्तर दिले. निवडणुकीपुर्वी 2017 मध्ये तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यागेश बहल यांनी सुखवानी कॅम्पस सोसायटी येथे अंध, अपंग व विधवा महिला यांच्यासाठी 40 टपर्‍यांचे ‘हॉकर्स झोन’चे नियोजन केले होते. परंतु, त्यावेळी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे उमेदवार दिनानाथ जोशी यांनी उपोषण केल्यामुळे ते नियोजन पुढे ढकलण्यात आले. 

दरम्यान; त्या टपर्‍या वाडीलाल बसस्टॉप शेजारील महापालिकेच्या मैदानात बंदीस्त ठेेवण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी संततुकारामनगर टपरीनगर होत असल्याची टिका 20 मार्च रोजी केली. त्याच रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाडीलाल बसस्टॉप मैदानातील 24 टपर्‍या रातोरात हलवून गोल मार्केट मागील बाजूस टाकल्या. या टपर्‍या बहुतांश भाजप कार्यकर्त्यांना वाटण्यात आल्या होत्या. मुळ टपरी धारकांना कुठलेही मुल्य न देता या टपर्‍या चोरण्यात आल्या होत्या. तशी लेखी तक्रार संत तुकारामनगर पोलीस चौकीत दि. 27 मार्च रोजी करण्यात आली. दरम्यान; सत्ताधारी भाजपच्याच नगरेसवकांनी महापालिका अधिकार्‍यांवर दबाव आणत टपर्‍यांवर कारवाई करण्यास भाग पाडले, असा आरोप बहल यांनी केला आहे.