Wed, Apr 24, 2019 08:27होमपेज › Pune › तक्रार घेण्यास कोणीच नसल्याने पोलिस चौकीची केली तोडफोड

तक्रार घेण्यास कोणीच नसल्याने पोलिस चौकीची केली तोडफोड

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 1:00AMपुणे : प्रतिनिधी

तक्रार घेण्यासाठी चौकीत पोलिस नसल्याने चौकीच फोडल्याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी रात्री वारजे पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या रामनगर पोलिस चौकीत घडला. पुणे शहरातील गुन्हेगारीने कळस गाठल्याचे बोलले जात आहे.  

शहर गुन्हेगारीने बरबटल्याचे बोलले जात असताना त्यावर या प्रकाराने शिक्कामोर्तब झाला असून, एकीकडे सर्वसामान्यांच्या वाहनांची टोळक्याकडून तोडफोड केली जाता असताना दुसरीकडे पोलिस ठाणीही असुरक्षित असल्याचे चित्र बुधवारी रात्री रामनगर येथील चौकी फोडल्यानंतर  समोर आले आहे. वारजे माळवाडी भागात ही घटना घडली आहे. 

रामनगर परिसरात दोन गटामध्ये झालेल्या भांडणानंतर दोघे जण पोलिस रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रामनगर पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंगसाठी बाहेर गेल्याने दोघांना तक्रार द्यायची असल्याने तेथे कोणीच नसल्याने वैतागून त्यातील एकाने चौकीतील टेबलवर शिडीने काचांचे नुकसान केले. वारजे माळवाडी भागात दोन टोळक्याच्या वादातून कायम दहशतीचे वातावरण असते.

किरकोळ वादात अचानक टोळक्याकडून पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते. गुरुवारी या घटनेचा फटका पोलिसांना बसला आहे. याबाबत जाम्या नावाच्या सराईतावर भादवि कलम 427 अन्वये वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोळे यांनी दिली.