होमपेज › Pune › पोलिस भरती : नांदेड पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार पुण्यातील कंपनीचा कर्मचारी

पोलिस भरती : नांदेड पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार पुण्यातील कंपनीचा कर्मचारी

Published On: Apr 27 2018 1:06AM | Last Updated: Apr 27 2018 12:22AMपुणे : प्रतिनिधी 

नांदेड येथे पोलिस भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकार प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा पुण्यातील एका नामांकित कंपनीचा कर्मचाऱी असल्याची माहिती समोर आली आहे.  प्रवीण भटकर असे त्याचे नाव असून, तो ईटीएच कंपनीत बिझेनस मॅनेजर म्हणून काम करीत आहे़ 

नांदेड येथे 69 पोलिस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया पार पडली़  या प्रक्रियेत लेखी परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी उत्तरपत्रिका जाणीवपूर्वक कोर्‍या ठेवल्या होत्या़   पेपर तपासणीच्या वेळी संगणकीय विभागात काम करणार्‍या ऑपरेटर्समार्फत रिकाम्या उत्तरपत्रिकेवर योग्य उत्तरे भरून त्यांना 90 गुण देण्यात आले. नांदेड पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणत प्रवीण भटकर याच्यासह 11 जणांना बुधवारी अटक केली आहे़ 

असे वाढवले गुण...

पुण्यातील ई टीएच कंपनीची स्थापना संगणकतज्ज्ञ डॉ़  विजय भटकर यांनी  केली आहे़  प्रवीण भटकर या कंपनीत बिझनेस मॅनेजर म्हणून काम करतो. डॉ़  भटकर यांनी 3 वर्षांपूर्वीच या कंपनीचा राजीनामा दिला आहे़   प्रवीण भटकर याने स्वत:ची ओएमआर ही कंपनी काढली आहे़  या कंपनीमार्फत तो कंत्राट घेत असे़  त्याने नांदेडमधील पोलिसांना हाताशी धरून प्रत्येकाकडून साडेसात लाख रुपये घेतले आणि त्यांचे मूळ उत्तरपत्रिका नंतर लिहून त्यांचे गुण वाढवून दिले.

ईटीएच कंपनीला आपण 3 वर्षांपूर्वीच राजीनामा दिला आहे़  आमच्या गावात अनेक लोकांची आडनावे भटकर आहेत, इतकेच साधर्म्य आहे.  - डॉ़  विजय भटकर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ