Tue, Nov 13, 2018 06:03



होमपेज › Pune › कोरेगाव भीमा प्रकरण : गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी

कोरेगाव भीमा प्रकरण : गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी

Published On: Jun 07 2018 1:08PM | Last Updated: Jun 07 2018 1:23PM



पुणे : पुढारी ऑनलाईन

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्‍हा न्यायालयाने आज, गुरुवारी सकाळी झालेल्या सुनावणीत हे आदेश दिले. नागपूरमधील इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्‍स लॉयर्सचे गडिलंग सरचिटणीस आहेत. आज (दि.७) सकाळी ५ ते ७ या वेळेत याप्रकरणी येथील जिल्‍हा न्यायालयात सुनावणी झाली. 

गडलिंग यांना आज पहाटे न्यायालयात हजर करण्यात आले. अटक केल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असल्याचे कारण देत शिवाजीनागर जिल्हा न्यायालयात सकाळी सुनावणी झाली.  तर सुरक्षेच्या कारणास्‍तव आरोपीला पहाटे हजर करण्यात आले असल्याची शक्यता आहे. तर इतर आरोपींना गुरुवारी दुपारपर्यंत न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. 

गडलिंग बाबत कोर्टात झालेला युक्तीवाद

याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील ॲड. उज्‍ज्वला पवार यांनी युक्तिवाद केला की, अटक केलेला आरोपी हा सीपीआय या माओवादी संघटनेचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्याकडून ८१ कागदपत्रे जप्त करणात आली आहेत. त्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबतचे नकाशे मिळाले आहेत. हे नकाशे सीपीआयला पुरविण्यात आले असल्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमाबाबत देखील काही पुरावे मिळाले आहेत. त्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये एकूण १६ मुद्दे आहेत. त्या आधारे त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी ॲड. पवार यांनी केली. आरोपींच्या वतीने ॲड. मालवीय यांनी युक्तिवाद केला, 

दरम्यान, याप्रकरणात अटक केलेल्या सुधीर ढवळेंसह पाचही जणांचे बंदी असलेल्या सीपीआय माओवादी पार्टीशी संबंध असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत, असे पोलिस सहआयुक्‍त रविंद्र कदम यांनी सांगितले.