Sat, Feb 23, 2019 02:22होमपेज › Pune › शिक्रापूर ठाण्यातील पोलिसाची आत्महत्या

शिक्रापूर ठाण्यातील पोलिसाची आत्महत्या

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 14 2018 11:55PMशिक्रापूर/मांडवगण फराटा : वार्ताहर 

शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक प्रल्हाद शंकर सातपुते (वय 47, रा. राजेगाव, ता. दौंड) यांनी रविवारी (दि.13) रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याने शिरूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात त्यांची सर्वांत पहिली मांडवगण फराटा चौकीला नियुक्‍ती झाली होती. तेथे त्यांची स्वच्छ प्रतिमा असल्याने एक चांगला कर्मचारी  गमावल्याची खंत परिसरासह तालुक्यातून व्यक्‍त होत आहे. 

पोलिस नाईक प्रल्हाद  सातपुते यांचा मृतदेह सोमवारी (दि.14) सकाळी पिंपळे धुमाळ मुखई रस्त्याच्या कडेला झाडाला मिळाला. त्यांनी या पूर्वी शिरूर पोलिस स्टेशनला असताना चांगले काम केले होते. तसेच ते चांगल्या स्वभावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.सकाळी घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सातपुते यांनी पाबळ येथे त्यांनी रोड रोमिओना चांगला चाप लावला होता. पाबळ येथे एका युवकाने आत्महत्या केल्यानंतर हिंसक पडसाद उमटले होते. याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते.