Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Pune › पोलिसाने मारहाण केल्याने पाबळला युवकाची आत्महत्या

पोलिसाने मारहाण केल्याने पाबळला युवकाची आत्महत्या

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:37AMशिक्रापूर : वार्ताहर

पाबळ (ता. शिरूर) येथे फुटाणवाडीतील नवनाथ बबन वरखडे या युवकाने शिक्रापूर पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या पाबळ चौकीतील पोलिस शिपायाने केलेल्या मारहाणीच्या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप करीत सोमवारी (दि.19) सकाळी ग्रामस्थांनी   बाजारपेठ बंद पाडली. तणाव निर्माण झाल्याने घटनेचे गांभीर्य पाहून येथे राज्य राखीव दलाचे पोलिस तैनात करण्यात आले.

पाबळ येथील सोसायटीचे माजी चेअरमन दत्तू शिनलकर व मयत नवनाथ वरखडे यांचा दोघांचा आर्थिक व्यवहार होता. या दोघांत आर्थिक कारणावरून वादावादी झाली. शिनलकर यांनी 11 फेब्रुवारी रोजी वरखडे याच्या विरोधात पाबळ पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पाबळ पोलिस चौकीचे पोलिस कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी 12 फेब्रुवारी रोजी नवनाथ याला दोन वेळा मारहाण केली. सातपुते यांनी 12 फेब्रुवारी रोजीदेखील नवनाथ याला दत्तू शिनलकर यांच्या संगनमताने मारहाण केली. त्यामुळे नवनाथ हा आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला.