Wed, Nov 21, 2018 11:13होमपेज › Pune › कोरेभाव-भीमा : १२ जणांना कोठडी; तिघे अल्पवयीन

कोरेभाव-भीमा : १२ जणांना कोठडी; तिघे अल्पवयीन

Published On: Jan 09 2018 3:31PM | Last Updated: Jan 09 2018 3:31PM

बुकमार्क करा
पुणे - पुढारी ऑनलाईन
कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसचार प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील तिघेजण अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज, शिक्रापूर न्यायालयाने ९ जणांना पोलिस कोठडी दिली आहे. अटक केलेल्यांच्या नावाची गुप्तता पाळण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 


कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार त्याचबरोबर वढू बुद्रुक येथे २९ डिसेंबरला झालेली दगडफेक याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक कण्यात आली. काही जण कोरेगाव भीमाचे तर काही जण सणसवाडी कोंढापुरीचे आहेत. पोलिसांनी त्यांच्या दंगल करणे, जाळपोळ, दगडफेक तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल आहेत.  दगडफेक जाळपोळीतील आरोपींची ओळख पटविण्यासाठी गावातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेण्यात येत आहे.