Sun, Feb 17, 2019 17:12होमपेज › Pune › अरुण गवळीच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावणे पडले महागात 

अरुण गवळीच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावणे पडले महागात 

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 11:03PMखडकी : वार्ताहर 

जेलमध्ये बंद असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्समुळे काही युवकांना आता त्रासदायक ठरले आहे. गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावणार्‍या युवकांना चांगलेच महागात पडले आहे. डॉन गवळी यांच्या फ्लेक्स लावणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वाढदिवसानिमित्त काही युवकांनी बोपोडी चौकांमध्ये फ्लेक्स लावले होते. या प्रकरणी गणेश बाबुराव सोनवणे (वय 41)आणि सुरेश बाबुराव ससाणे (वय 45) याच्यासह 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बोपोडी आणि खडकी परिसरामध्ये काही ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले होते. फ्लेक्स लावण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. अवैधरित्या लावलेल्या फ्लेक्सवर पोलिसांनी कारवाई करीत 32 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.