Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Pune › पुणे : जुगार खेळताना पोलिस निरीक्षकाला अटक

पुणे : जुगार खेळताना पोलिस निरीक्षकाला अटक

Published On: Dec 09 2017 12:01PM | Last Updated: Dec 09 2017 12:01PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाई जुगार खेळताना ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सापडला आहे. या प्रकरणी  पोलिस अधिकाऱ्यासह ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने ग्रामीण तसेच शहर पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे.

बारामती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासह तबल 41 जणांना पोलिसांनी पकडले आहे. तर क्लब चालक माजी नागसेवक अविनाश जाधव यांच्या सह 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा परिसरात कपिल मॅट्रिक्स इमारतीमध्ये मध्यरात्री धाड टाकण्यात आली. त्यावेळी पोलीसानी जाधव यांच्यासह ४१ जणांना ताब्यात घेतले. तर त्या ठिकाणावरून ७ लाखाची रोकड, ४  चार चाकी आणि दुचाकी, टीव्ही असा जवळपास १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि त्यांच्या पथकाने केली.