Thu, Nov 15, 2018 12:39होमपेज › Pune › पुणे : शिक्रापूर येथे कॉन्स्टेबलची आत्महत्या

पुणे : शिक्रापूर येथे कॉन्स्टेबलची आत्महत्या

Published On: May 14 2018 11:33AM | Last Updated: May 14 2018 11:33AMशिक्रापूर (पुणे) : प्रतिनिधी  

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलने गळफास घेवून केली आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी गावाजवळच्या जंगलात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून कौटुंबिक की कामाचा तणाव की इतर कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे.

प्रल्हाद सातपुते हा काल (रविवारी) दिवस पाळीसाठी कामावर होते. आज त्याचा मृतदेह पोलिस ड्रेसमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून नक्की आत्महत्या की हत्या याचा तपास करत आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच अतिरिक्‍त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. रॉय यांच्या आत्महत्येने राज्य पोलिस दलात खळबळ उडाली होती.