Thu, Jul 18, 2019 06:21होमपेज › Pune › पोलिस आयुक्तालय मोशी सेंटरमध्ये

पोलिस आयुक्तालय मोशी सेंटरमध्ये

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 1:02AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे कायमस्वरूपी कार्यालय मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या (सेंटर) 40 एकर जागेत बांधण्याचे नियोजन आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी गुरूवारी (दि.12) सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले की, प्राधिकरणाची मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी सुमारे 240 एकर जागा राखीव आहे. त्यातील 40 एकर जागेत पोलिस आयुक्तालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. तसे मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला आहे.

त्यातील 100 एकर जागेत ‘पीपीपी’ तत्वावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 900 कोटींचा खर्च अपेक्षित आहेत. हे केंद्र अद्ययावत व अत्याधुनिक असे असणार आहे. उर्वरित 60 एकर जागेत शैक्षक्षिक संस्थांचे संकुल उभे केले जाईल. पुण्यात असलेल्या 50 व 100 वर्षे जुन्या नामवंत शैक्षणिक संस्थांचे केंद्र येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना पुण्यात जावे लागणार आहे. ती सोय शहरात उपलब्ध झाल्याने येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. त्याकरीता अनेक संस्थांचे प्रस्ताव येत आहेत. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आहे, असे लांडगे यांनी सांगितले. 

आमदार जगताप म्हणाले की, शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय आणण्याचे श्रेय भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. शहराची लोकसंख्या 20 लाख किंवा दोन आयुक्तालयामध्ये 50 किलोमीटर अंतर हवे अशी अट आहे. 

शहराची 20 लाखांच्या पुढे लोकसंख्या असल्याने शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय मंजुर झाले आहे. सध्या प्राधिकरणातील कार्यालयात पोलिस आयुक्तालय सुरू करण्यात येणार आहे. एक मे रोजीचे उद्घाटन पुढे जाण्याची शक्यता आहे. प्राधिकरण कार्यालयाच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या काळासाठी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. भाड्याने इमारत घेऊन कार्यालय सुरू केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Tags ; pimpri, pimpri news, Police Commissioner, office, Moshi Center,