Thu, Jul 18, 2019 06:06होमपेज › Pune › पुणे : विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये पोह्यात प्लास्टिक

पुणे : विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये पोह्यात प्लास्टिक

Published On: Feb 22 2018 5:06PM | Last Updated: Feb 22 2018 5:06PMपुणे : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये पोह्यात प्लॅस्टिकचे तुकडे सापडले. विद्यापीठातील विधी विभागात असलेल्या सनतृप्ती कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडला आहे. यबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांना दमबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 विद्यापीठाच्या कॅन्टीनचे चालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांवर दमबाजी करत आहेत. संबंधित कॅन्टीन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे.