Sat, Jul 20, 2019 13:20होमपेज › Pune › झाडांवर फलक,  खिळे ठोकल्यास गुन्हा दाखल होणार 

झाडांवर फलक,  खिळे ठोकल्यास गुन्हा दाखल होणार 

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:12AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात झाड्यांवर खिळे ठोकून फलक व पोस्टर लावले जातात. तसेच पोस्टर, भिंतीपत्रे व जाहिराती लावल्या जातात. त्यामुळे शहराच्या सौदर्यास बाधा पोहचत असून विद्रुपीकरण वाढत आहे. त्यामुळे पालिका अशा प्रकारे फलक व पोस्टर लावण्यावर गुन्हे दाखल करणार आहे. येत्या तीन दिवसांमध्ये हे फलक, पोस्टर व जाहिराती काढून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

शहरात रस्त्याच्याकडेने स्वत:च्या व्यवसायाची जाहिरात व्हावी या हेतूने काही जाहिरादार झाडांवर खिळे ठोकून तसेच, पोस्टर, भिंतीपत्रके व जाहिराती लावतात. त्याचबरोबर उड्डाणपुल व पालिकेच्या इमारती, सीमा भिंतीवरही पोस्टर व भिंतीपत्रके लावली जातात. यामुळे झाडास इजा पोहचून नुकसान होते. शहराच्या सौदर्यास बाधा पोहोचून विद्रूपिकरण होत आहे. 

असे विनापरवाना लावललेले पोस्टर, भिंतीपत्रके व जाहिराती येत्या 3 दिवसांमध्ये काढून घेण्याचे आवाहन पालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाने केले आहे. अन्यथा महाराष्ट्र विरूपन प्रतिबंध अधिनियम 1995 अन्वये नजीकच्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

 ‘स्थायी’ने अधिकार्‍यांना  धारेवर धरले-

शहरातील उड्डाणपुल आणि पालिकेच्या इमारती व सिमाभिंतीवर फलक, पोस्टर व जाहिराती लावून शहर विद्रुप केले जात असून, फलक, पोस्टर व जाहिरातीवर असलेल्या संपर्क क्रमांक व पत्तानुसार संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा सूचना स्थायी समितीने प्रशासानाला महिन्यापूर्वी दिल्या होत्या. मात्र, कारवाईची जबाबदारी घेण्यास कोणताही विभाग पुढे येत नव्हता. त्यामुळे बुधवारी (दि.25) झालेल्या समितीच्या सभेत समितीने आयुक्तांना जाब विचारला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याचे स्पष्ट केले.