Fri, Feb 22, 2019 03:25होमपेज › Pune › भोसरीत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या 

भोसरीत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या 

Published On: Aug 10 2018 5:40PM | Last Updated: Aug 10 2018 5:40PMपिंपरी : प्रतिनिधी 

भोसरीमध्ये राजेश्वर पाटील या मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कित्येक मोर्चे काढूनही सरकार आरक्षण देत नसल्याने राजेश्वरने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांना गुरुवारी (दि.९) सकाळी भोसरी परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह  झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. आज शुक्रवारी (दि.१०) रोजी नातेवाईक आल्यानंतर राजेश्वरने आत्महत्या केल्याचे समोर आले. 

राजेश्वर बेरोजगार असून, तो सध्या संत तुकाराम नगर येथे त्याच्या मोठ्या भावाकडे राहत होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने राजेश्वर गेल्या कित्येक दिवसांपासून तणावाखाली होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप राजेश्वरचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर यांनी केला आहे. याबाबत भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, आरक्षण हे राजेश्वरच्या आत्महत्येचे कारण नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, लवकरच खरे कारण समोर येईल.