Mon, Jul 22, 2019 13:27होमपेज › Pune › ‘पेव्हिंगब्लॉक’ कामाचे नवे धोरण जाहीर

‘पेव्हिंगब्लॉक’ कामाचे नवे धोरण जाहीर

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 1:59AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात  पेव्िंहग ब्लॉक बसविण्याचे काम करताना जुने व काम झाल्यानंतरच्या कामाचे; तसेच जुने पेव्िंहगब्लॉक कोठे बसविले त्याचेही छायाचित्र आवश्यक आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे धोरण (पॉलिसी) जाहीर केले असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  सांगितले. शहरात ठिकठिकाणी विविध भागात वर्षभर पेव्िंहगब्लॉक बसविण्याचे काम सुरू असते. या कामात पारदर्शकता हवी म्हणून महापालिकेने नवे धोरण जाहीर केले आहे. त्यासंदर्भात माहिती देताना आयुक्त हर्डीकर पत्रकारांशी  बोलत होते. 

हर्डीकर म्हणाले की, पेव्िंहगब्लॉक कामात सुसूत्रता येण्यासाठी हे धोरण तयार केले आहे. पेव्िंहगब्लॉक बसविताना पूर्वीचे आणि काम झाल्यानंतरचे छायाचित्र सादर केल्यानंतर संबंधित कामांची बिले मंजूर केली जाणार आहेत; तसेच जुने ब्लॉक काढून तेथेच किंवा दुसरीकडे बसविले त्या कामाचेही छायाचित्र सक्तीचे केले आहे. हे काम दर्जेदार हवे, हा या मागील हेतू आहे.  पेव्िंहग ब्लॉक कामासाठी साधारण वर्षाला 20 कोटी रुपये खर्च होतात. 

या कामात एकसमानता यावी म्हणून ‘रोड फर्निचर स्टँडराईड’ आखले जाणार आहे. तशा सूचना स्थायी समिती सभेत केल्या आहेत. त्यानुसार नवा रस्ता तयार करताता विशिष्ट आकाराचे रस्ते आणि पदपथाचा आकार निश्‍चित केला जाईल आणि कोणत्या दर्जाचे, आकाराचे व रंगाचे ब्लॉक वापरायचे हे ठरविले जाईल.