Thu, Jun 20, 2019 01:43होमपेज › Pune › बसमध्ये प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत

बसमध्ये प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:45AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

बसमध्ये चढत असताना किंवा उभा असताना गर्दीचा फायाद घेत प्रवाशांच्या पर्स, पाकीट, पिशवीतून  किंमती ऐवज चोरणार्‍या  महिलेला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.15) सकाळी अकराच्या सुमारास डांगे चौकात केली. वनिता राख साखरे (40, रा. हडपसर) असे अटक महिलेचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यात ठिक-ठिकाणी पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत महिला आणि पुरुषांचा किंमती ऐवज चोरीला गेल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिस अशा चोरट्यांचा शोध घेत होते. 12 डिसेंबरला प्रवासादरम्यान एका महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी असलेली पर्स चोरट्यांनी पळविली होती. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने तिच्या मागावर होते.

शुक्रवारी पोलिस साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात ती डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. पोलिसांनी छायाचित्रे पाहिले आणि ती पाकिट मारणारी महिला असल्याचे लक्षात येताच तिला ताब्यात घेतले. तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला आहे. साखरे हिच्यावर स्वारगेट तसेच खडकी पोलिस ठाण्यात अशा प्रकारे चोरी केल्याची गुन्हे दाखल आहेत. शहरात इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे दाखल झाले असून पोलिस त्याअनुषंगाने तपास करत आहेत.