Wed, Apr 24, 2019 19:43होमपेज › Pune › मगर, अजगर चोरीवरून सभागृहात वादळी चर्चा

मगर, अजगर चोरीवरून सभागृहात वादळी चर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयातील मोर, मगर, सर्प आणि अजगर चोरीचे प्रकार थांबत नसून, प्रशासन केवळ चौकशी समिती नियुक्त करून हात झटकत आहे, असे आरोप करीत सदस्यांनी आयुक्तांना धारेवर धरले. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.28) झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. प्राणी संगोपन केंद्र उभारण्यासाठी 35 लाख निधी वर्ग करण्याच्या विषयावरून सर्पोद्यानातील प्राणी मृत्यू व चोरीचा विषयाच्या चर्चेस तोंड फुटले. मनसेचे सचिन चिखले यांनी मगर व अजगर चोरीचे काय झाले, याची माहिती देण्याची मागणी केली.  सर्पोद्यानातून अजगरासारख्या सर्प चोरीला जातो हा गंभीर प्रकार आहे. हे षड्यंत्र असून, या गोष्टी थांबायला हव्यात. मगर चोरीच्या वेळी कारवाई झाली असती, तर हे प्रकार थांबले असते.

मोकाट कुत्री पकडण्यासाठी एकच वाहन असल्याने कारवाई होत नसल्याचे मिनल यादव यांनी संताप व्यक्त केला. समाविष्ट ग्रामीण भागातही प्राणी संगोपन केंद्र सुरू करण्याची मागणी राहुल जाधव यांनी केली. आजारी कुत्र्यांसोबतच भटक्या कुत्र्यांना पकडून संगोपन केंद्रात दाखल करावे, अशी मागणी वैशाली घोडेकर यांनी केली. 

स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या की, प्राणी संग्रहालय, स्मार्ट सिटी, मॉडर्न वॉर्ड आदी सर्वच प्रकल्प आपल्या वॉर्डात करण्याचे हट्ट धरणारे आता मर्यादा सोडून बोलत आहेत. मगर, अजगरप्रकरणी चौकशी सुरू आहे. नियमानुसार पांढर्‍या उंदरांची खरेदी झाली आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीला धारेवर धरत तुम्ही केलेला कचरा साफ करण्यात वेळ जात असल्याची टीका केली. प्राणी चोरी व मृत्यू प्रकरणाची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी दिली.