Sat, Sep 22, 2018 10:40होमपेज › Pune › अपघातात बालकासह दोघे ठार

अपघातात बालकासह दोघे ठार

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:43AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पुणे - मुंबई महामार्गावर कामशेत येथील ताजे पेट्रोलपंपाजवळ सर्व्हिस रस्त्याने जाणार्‍या दोन कारची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात वडिलांसह आठ महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. तर याच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. सुमित जयपाल रोसलानी (30, रा. उल्हासनगर) व हितीका सुमित रोसलानी (8 महिने) अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर वीणा ज्ञानचंद रोसलानी (40), क्रीशा सुमित रोसलानी, रवी तुलसीदास रोसलानी (28) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, स्वीफ्ट डीजायर कार (एमएच 05, सीएम 1215 ) ताजे पेट्रोलपंपावरुन पेट्रोल भरुन सर्विस रस्त्याने मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी मुबंईकडे जात असलेल्या इनोव्हा कारने (एमएच 47, के 4459) स्वीफ्ट डीजायरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उलटल्या. इनोव्हा कारमधील प्रवासी सुखरूप आहेत. मात्र स्वीफ्ट डीजायर कारचा चक्काचूर झाला असून, त्यामधील वडील आणि लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. तपास कामशेत पोलिस करत आहेत.