Fri, Apr 26, 2019 04:14होमपेज › Pune › दंगलीत मृत्यू पावलेल्या तरुणास श्रद्धांजली

दंगलीत मृत्यू पावलेल्या तरुणास श्रद्धांजली

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:27AM

बुकमार्क करा
पिंपरी ःवातार्ता

भीमा कोरेगाव-सणसवाडी परिसरात झालेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगळे यांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहून स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली.  बुधवारी (दि.3) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. फटांगळे यांना श्रद्धांजली वाहून सभा गुरुवारी (दि.4) दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आली. सभेत ऐनवेळचे विविध विषय दाखल करून घेण्यात आले.शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढून टाकण्यासाठी दोन वर्षे कालावधीसाठी निविदा कामास मंजुरी देण्याचा विषय ऐनवेळी दाखल करून घेण्यात आला.

त्यासाठी 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शहरात विविध ठिकाणी असलेल्यो जमिनीवरील अनधिकृत एकूण 7 व इमारतीवरील 14 लोखंडी होर्डिंग्ज काढून टाकण्यात येणार आहेत. या कामाची ई-निविदा 4 डिसेंबरला उघडण्यात आली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडानगरी येथे सुरू असलेल्या असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देणे. 

पालिका भवन व परिसराची सफाई कामासाठी बीव्हीजी इंडिया कंपनीस ‘जीएसटी’ करानुसार दर महिन्यास 69 हजार 504 रुपये असे एकूण 12 महिन्यांसाठी 8 लाख 34 हजार 52 रुपये वाढीव शुल्क देण्यास मान्यता देणे. पवनाथडी जत्रेत  गुरुवारी (दि.4) ते सोमवारी (दि.8) या पाच दिवसांसाठी खेळणी लावण्यासाठी ओम साई इंटरप्रायजेस यांना 11 लाख 36 रुपये दरास परवानगी देण्यात आली आहे.