Wed, Nov 21, 2018 15:47होमपेज › Pune › डॉक्टरची तीन लाखांची फसवणूक

डॉक्टरची तीन लाखांची फसवणूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

माझी मंत्रालयात ओळख असून, तुमची अडकलेली पेन्शन काढून देतो, असे सांगून वेळोवेळी तीन लाख घेऊन, पैसे परत न करता डॉक्टरची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी डॉ. भास्कर काळू बच्छाव (67, रा. वास्तुउद्योग कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे, तर पराग संतोष डिंगणकर (रा. कोथरूड, पौड रोड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बच्छाव हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते.

ते सध्या निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पेन्शनची रक्कम अडकलेली आहे. ही रक्क्कम काढून देण्यासाठी पराग याने स्वतःची ओळख मंत्रालयात आहे, असे भासवले. यासाठी वेळोवेळी डॉ. बच्छाव यांच्याकडून पैसे उकळले. त्यानंतर त्यांची पेन्शनची अडकलेली रक्कम; तसेच डॉ. बच्छाव यांच्याकडून घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली.