Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Pune › लग्नात जाऊन चोरट्यांनी मारला हात

लग्नात जाऊन चोरट्यांनी मारला हात

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 1:36AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

ताथवडे येथील एका मंगल क ार्यालयातून दोन लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.12) सकाळी आठ ते दुपारी दोनच्या सुमारास ताथवडे येथील मंगल कार्यालयात घडली. लग्नसमारंभात जाऊन चोरट्यांनी दोन लाखांची चोरी करत हात धुतला. राजेंद्र रामचंद्र महाडिक (54 रा. जोतिबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील मंगल कार्यालयात पाहुण्याच्या लग्नाला गेलेले असताना महाडिक यांच्या पत्नीने त्यांची पर्स मंगल कार्यालयाच्या एका खोलीत ठेवली होती. काही कामानिमित्त त्या खोलीतून बाहेर गेल्या असता चोरट्याने ती पर्स पळवली. या पर्समध्ये एक लाख 52 हजार रुपये रोख व दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, तीन कानातले असे 42 हजार रुपयांचे सोन्याचे

दागिने, असा एकूण एक लाख 94 हजार रुपयांचा ऐवज होता. मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास पोलिसांकडून केला  जात असून, लग्न समारंभाला जात  असताना आपल्या किमती ऐवजाची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.