Thu, Aug 22, 2019 10:47होमपेज › Pune › गृहपाठ केला नाही  म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण

गृहपाठ केला नाही  म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी :प्रतिनिधी 

गृहपाठ केला नाही म्हणून सहावित शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार जुनी सांगवीमधील नृसिंह हायस्कूलमध्ये शुक्रवारी घडला. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा सांगवी पोलिस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  मयांक पटवाना (12, रा. सांगवी)  या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याचे वडील गोपाळ पटवाणा (35, रा. कवडे नगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.

तर रसाळ नावाच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पटवाणा यांचा मुलगा मयांक हा जुनी सांगवी येथील नृसिंह हायस्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिकतो. मयांकने गृहपाठ केला नाही म्हणून शुक्रवारी शिक्षकाने मयांकला हाताने पाठीत बेदम मारले. झालेल्या प्रकाराबाबत मयांकने घरी सांगितले नाही. मात्र शनिवारी सकाळी मयांकच्या आईच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर मयांकच्या वडिलांनी सांगवी पोलिसात शिक्षकाविरोधात फिर्याद दिली. तपास सांगवी पोलिस करत आहेत.
 


  •